मुंबईत लवकरच सीसी टीव्ही कॅमेरे

मुंबई-वाढती गुन्हेगारी, वाहन अपघात व दहशतवादी हल्ल्यांची शक्यता लक्षात घेवून मुंबई शहरात ठिकठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय लवकरच अमलात येण्याची शक्यता आहे.हे कंत्राट रिलायन्स इन्फ्रास्टक्चर व अन्य काही कंपन्यांनी एकत्र ‘कर्न्सोशियम’ ने सादर केलेली निविदा सर्वात कमी किमतीची असल्याने ते कंत्राट त्यांनाच मिळेल असे कळते.

या कर्न्सोशियमची निविदा सर्वात कमी किमतीची असली तरीही एक हजार कोटी रूपयांची असल्याचे सांगण्यात येते. या कर्न्सोशियममध्ये रिलायन्स इन्फ्राखेरीज आयबीए, अलाइड डिजिटल सव्र्हिसेस, सिस्को यांचा समावेश आहे. मुंबईत सहा हजार ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यापासून, प्रत्यक्ष चित्रीकरण, तयार फुटेजची छाननी, त्या फुटेजचे ऑप्टिकल फायबरद्वारे संबंधित नियंत्रण कक्षाच्या ठिकाणी प्रक्षेपण व नियंत्रण कक्षामध्ये वर्क स्टेशन्स या सर्व बाबींचा त्यात समावेश आहे.

Leave a Comment