भंवरी देवीच्या चित्रपटनिर्मिती वरून वाद

सध्या देशभरात गाजत असलेला भंवरी देवी प्रकरणावर प्रकाश टाकणारा चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी निर्मात्याची एकच घाई झाली असून सर्वचजण या बहुचर्चीत विषयावर चित्रपट काढण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे सध्या भंवरी देवी प्रकरणावरील आधारित चित्रपट निर्मितीसाठीचा दोन निर्मात्यातील वाद आता कोर्टापर्यंत गेला आहे.

दिग्दर्शक निखील टांक व रंजीत शर्मा यांच्यातील वाद चित्रपट निर्मितीवरुन विकोपाला गेले आहेत. रंजीत शर्माच्या मते मी भंवरी देवी प्रकरणाशी निगडीत असलेल्या टायटलची मी खूप पूर्वीच नोंदणी केली आहे. त्यामुळे माझ्या प्राजेक्टची जर कोणी चोरी करीत असेल तर मी त्याला सोडणार नाही. त्यासाठी वाटेल ती न्यायालयीन लढाई लढण्यासाठी तयार आहे.

रंजीत शर्माच्या मते, व्यक्तीवर आधारित चित्रपटाची निर्मिती करायची असेल तर त्या व्यक्तीच्या कुंटुबीयांकडून तशा स्वरूपाची परवानगी घ्यावी लागते. त्या संदर्भात आम्ही भंवरी देवीच्या पतीकडून कायदेशीररित्या परवानगी घेतली आहे. या सोबतच या चित्रपटात भंवरी देवीच्या मुलाची भुमिका तिचा मुलगा साहिल हा करीत आहे. त्यामुळे न्यायालय आपल्याच चित्रपटाला परवानगी देईल. त्यामुळे आपण वाटेल ती न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत.

या चित्रपटावरून दोन्ही दिग्दर्शकात जुंपली असताना दुसरीकडे मात्र राजस्थानातील जाट समुदायाने या चित्रपटामुळे आमच्या भावनाना ठेच पोचत असल्याचे म्हटले आहे. त्यासंदर्भात त्यांनीही कोर्टात धाव घेतली असून निर्मात्याला याप्रकरणी कार्येची नोटीस दिली आहे. त्यामुळे भवरी देवीवरील चित्रपट एकुणच न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे.

Leave a Comment