तुर्कस्तान ऑलिम्पिंकच्या आयोजनाची बोली लावणार – रॉज

तुर्कस्तान, दि. २५ – तुर्कस्तानातील इस्तंबुल शहर ऑलिम्पिक आणि युरोपीयन फुटबॉल चॅम्पियनशीप हे दोन्ही एकाच वर्षी आयोजित करण्याच्या विचारात आहे. पण तुर्कस्तान सरकारने ऑलिम्पिकच्या बाबतीत आयोजनाच्या बोलीला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती ऑलिम्पिक प्रमुख रॉज यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

तुर्कस्तान फुटबॉल संघटनेकडून २०२० च्या युरोपियन चॅम्पियनशीपसाठी बोली लावण्यात येणार आहे. पण युरोपियन फुटबॉल संघटनेकडून अजूनतरी त्यास मान्यता मिळालेली नाही. तसेच या स्पर्धेच्या आर्थिक बाजू बाबतीत सरकार खात्रीलायक नसल्याचे रॉज यांनी स्पष्ट केले. तुर्कस्तानकडून एकच अधिकृत बोली लागली ती म्हणजे ऑलिम्पिकसाठी, असेही ते म्हणाले. इस्तबुल सोबत तुर्कस्तान आणि मॅडरिडही २०२० च्या ऑलिम्पिकच्या शर्यतीत आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बाकु आणि दोहा या शर्यतीतून बाहेर पडल्याचे सांगितले आहे. आमचे प्राधान्य ऑलिम्पिकलाच राहील, असे इस्तबूलसाठी अधिकृत बोली लावणारे हसन अरत म्हणाले. 

Leave a Comment