तनवानी-देवगण पुन्हा एकत्र

अजय देवगण आणि निर्माता गोवर्धन तनवानी ही एकेकाळची हिट जोडी लवकरच एकत्र दिसणार आहे. तनवानी आणि अजयच्या `इश्क’ आणि `प्यार तो होना ही था’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळविले होते. आता ही जोडी पुन्हा एकत्र येणार असल्याची माहिती हाती आली आहे. अजय आणि तनवानी लवकरच एका नवीन चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात करणार असल्याचे समजते. ‘वॉंटेड’द्वारे बॉलीवूडमध्ये  यशस्वी पदार्पण करणार्‍या प्रभू देवाकडे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. अजयच्या अजय देवगण फिल्मस् आणि तनवानींच्या बाबा फिल्मस्च्या बॅनरखाली तयार होणार्‍या या चित्रपटाचे नाव अद्याप निश्‍चित झाले नाही. मात्र, लवकरच निर्मितीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment