मोबाईल ग्राहकांच्या संख्येत वाढ

दूरसंपर्क सेवा देणार्‍या कंपन्यांच्या जीएसएम ग्राहकांच्या संख्येत एप्रिलमध्ये ६५ लाखांची भर पडली. यामुळे या महिन्याअखेरीस देशातील एकूण जीएसएम ग्राहकांची संख्या ६७ कोटी ५ लाखांवर जाऊन पोहचली आहे.

रेग्युलर ऑपरेटर संघटनेच्या आकडेवारीनुसार या महिन्यात भारती एअरटेलने सर्वाधिक ग्राहक जोडले. या महिन्यात कंपनीच्या ग्राहक संघटनेमध्ये २० लाख नवीन ग्राहकांची भर पडली. तसेच आयडीआयनेही १४ लाख ८० हजार नवीन ग्राहक जोडले. यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या ११ कोटी ४२ लाख झाली. युनिनॉरनेही गेल्या काही महिन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असून कंपनीची सेवा घेणार्‍या ग्राहकांची संख्या वाढत आहे. या महिन्यात युनिनॉरला ११ लाख नवीन ग्राहक मिळाले. दूरसंपर्क क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी असलेल्या व्होडाफोनच्या ग्राहकांच्या संख्येमध्येही ८१ हजार नवीन ग्राहकांची वाढ झाली आहे. यामुळे एकूण ग्राहकांची संख्या १५ कोटी १२ लाखांवर गेली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सरकारी कंपन्यांची सेवा घेण्यास मात्र ग्राहकांनी नापसंती दर्शवली असून या महिन्यात बीएसएनएलच्या ग्राहकात वाढच झाली नाही तर एमटीएनएलचे १० हजार ग्राहक कमी झाले असल्याचे सेल्यूलर ऑपरेटरने म्हटले आहे.

Leave a Comment