
वर्धा, दि. २६ – दिवसाकाठी उजेडात येणार्या घोटाळ्याची जणू काही मालिकाच सुरू झाली आहे. आता नर्सिंग कॉलेजसमध्ये वितरित करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीचा नवा घोटाळा पुढे आला आहे. केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमांमध्ये समावेश नसतांनाही नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेशितांना अंदाजे ९० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली. वरिष्ठ पातळीवरुन निघालेल्या आदेशानंतर झालेल्या या घोटाळ्याप्रकरणी सरकारने चौकशीचे आदेशही दिले आहेत.
