‘दबंग’शी तुलना नको – श्रुती हसन

कमल हसनची मुलगी श्रुती हसनचा ‘गब्बरसिंग’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. श्रुती हिंदीशिवाय तामिळ आणि तेलुगू चित्रपटांतदेखील काम करीत आहे. मागील आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘गब्बरसिंग’ हा सलमानच्या दबंगचा रिमेक आहे. पण श्रुती म्हणते की, चित्रपट किंवा माझ्या भूमिकेची तुलना सलमानच्या चित्रपटाशी केली जाऊ शकत नाही. श्रुती सध्या दक्षिणेतील चित्रपटात मग्न आहे. त्यामुळे ती बॉलीवूड चित्रपटात दिसत नाही. गब्बरसिंग मधील अभिनयासाठी श्रुतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे. श्रुती म्हणते की, हा चित्रपट तेलुगू प्रेक्षकांसाठी एकदम योग्य आहे. या चित्रपटात मी एका गावातल्या मुलीची भूमिका साकारली आहे. चित्रपट रिमेक आहे. मात्र, यात खूप बदल करण्यात आलेला आहे. चित्रपट मिळताच श्रुतीची तुलना सोनाक्षी सिन्हासोबत होणे सुरू झाली होती. यावर ती म्हणते की, चित्रपट रिमेक आहे म्हणून तुलना केली जात असावी; पण यात गावातल्या मुलीची भूमिका सोडता काहीच समान नाही.

Leave a Comment