यंदाच्या कला गौरव पुरस्काराचा मानकरी सिद्धार्थ जाधव

पुणे, दि. – शाहीर मधू कडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नटरंग प्रतिष्ठानचा कला गौरव पुरस्कार यावर्षी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना जाहीर झाला आहे. रोख रूपये ५,००० आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ३१ मे रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित केला आहे अशी माहिती नटरंग प्रतिष्ठानचे संचालक जतीन पांडे यांनी दिली.

या पुरस्कार सोहळयास आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ आणि उपमहापौर दीपक मानकर तसेच कला क्षेत्रातील मधु कांबीकर, संतोष पवार, दादा पासलकर, राघवेंद्र कडकोळ आदी उपस्थित राहणार आहेत. या सोहळयात ऍकॅडमीचे २५० बालकलाकार नृत्यनाद हा कार्यक्रम सादर करणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले.

Leave a Comment