गीता बसराने केले हरभजनला बोल्ड

आयपीएलचा सीझन शेवटच्या टप्प्यात आला असताना आता क्रिकेटपटूच्या विवाहाच्या घोषणा होत आहेत. क्रिकेट व बॉलीवूड क्षेत्राचे पूर्वीपासून खास संबंध आहेत. दोन्ही क्षेत्रातील मंडळीना अमाप पैसा व भरपूर प्रसिद्धी मिळत असल्याने आतापर्यंत बॉलीवूडच्या बर्‍याच नायिकांनी क्रिकेटपटूशी विवाह करून सुखाने संसार करीत आहेत.

आता या मंडळीत नव्याने भर पडली आहे ती अभिनेत्री गीता बसरा व भारताचा फिरकी गोलंदाज हरभजनसिंग जोडीची. गेल्या अनेक दिवसांपासून गीता व हरभजन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले जात होते. मात्र गीता व हरभजनने आता लग्न करण्याचा निर्णय घेतला असून दोघे संप्टेबर महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहेत.

दोघेजण लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत होती. मात्र दोघांनीही याला नकार दिला होता. सप्टेबर महिन्यात जालंधरमध्ये दोघांचा विवाह होणार असून आतापासूनच त्यांच्या विवाहाची तयारी सुरू आहे. या विवाह सोहळ्यासाठी बॉलीवूड व क्रिकेट क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थितीत राहणार आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून गीता व हरभजन सिंग यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. अनेक वेळा दोघांना एकत्रित फिरताना अनेक जणांनी पाहिले होते. त्यामुळे ते लग्नाच्या बेडीत केव्हा ना केव्हा तरी अडकतील याची कल्पना सर्वांना आली होती. हरभजनने यापूर्वी आपल्या जादूई फिरकी गोलंदाजीने अनेक जणांना बोल्ड केले. मात्र अभिनेत्री गीता बसराने आपल्या सौंदर्याच्या जोरावर हरभजनलाच बोल्ड केले आहे.

Leave a Comment