शाहरुखची दादागिरी कधी थांबणार ?

शाहरूख खानचा संघ सध्या आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या पाच सीझनपासून विजेतेपदाची वाट पहाणार्‍या शाहरूखचे स्वप्न यावेळेस पूर्ण होईल असे वाटत आहे .मात्र दुसरीकडे शाहरूख त्याच्या वेगवेगळ्या दादागिरीच्या कारणाने चांगलाच प्रकाश झोतात आला आहे. त्याचे हे दादागिरीचे फॅड कधी थांबणार असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

शाहरूख  खानने गेल्या आठ दिवसाच्या काळात त्याची दादागिरीची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. त्यामुळे तो सध्या भलत्याच चर्चेत अडकला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सिगारेट ओढल्याने शाहरूख प्रकाश झोतात आला होता. हे एक प्रकरण सध्या न्यायालयात गेले असून न्यायालयाने त्याल २६ मे रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हे प्रकरण ताजे असतानाच त्याने वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरूद्द कोलकत्ता नाईट रायडर्स समान्यावेळी मद्यपान करून सुरक्षा रक्षकाला मारहाण, पदाधिकार्‍यांना शिवीगाळ केली होती.त्यामुळे हे प्रकरण मिडियाने चांगलेच उचलून धरले होते. त्यामुळे तर तो शहाणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र पुण्यातील उपांत्य फेरीतील सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सने अंतिम सामन्यात प्रवेश केल्याने शाहरूखने बराच गोंधळ घातला. सहारा स्टेडियमच्या मैदानाला फेरी मारून प्रेक्षकांना अभिवादन करताना त्याने प्रेक्षकांना उद्देशून बुटाकडे बोट दाखविले. यामुळे आणखीन एक वाद शाहरूखने ओढवून घेतला आहे. शाहरूखच्या  या वागण्यामुळे मुंबई क्रिकेट असोशिएशनने त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे.

यासर्व प्रकरणातून मात्र शाहरूख काहीच धडा ध्यायला तयार नाही. दिवसेंदिवस त्याच्या दादगिरीत भरच पडत आहे. त्यामुळे आगामी काळात त्याचे वर्तन सुधारण्यासाठी आयपीएल कडून त्याला काही सूचना देण्यात येतात की काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment