पाचव्या सीझनमध्ये पुणे वॉरिसर्यचा कर्णधार म्हणून सौरभ गांगूलीची कारकीर्द अपयशी ठरली आहे. त्यामुळे आगामी सीझनमध्ये खेळण्याऐवजी सौरभ आयपीएलला रामराम करतो की काय असे वाटत होते. मात्र गांगूलीने अजून मी वयाची चाळीशी ओलांडली नसल्याने मी अजून खेळतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सहाव्या सीझनची तयारी करतोय गांगूली
पाचव्या सीझनमध्ये पुणे वॉरियर्सचा कर्णधार म्हणून केवळ माझीच कामगिरी खराब झाली नाही तर अन्य कर्णधारांची कामगिरी खराब झाली आहे. केवळ काही मंडळीकडून माझ्याच कामगिरीतील उणेदुणे काढून टीका करण्याचे काम केले जात असल्याचे सौरभने स्पष्ट केले आहे. मी पण एक सर्वसामान्य असाच खेळाडू आहे. त्यामुळे माझ्याकडूनही चुका होणारच. मी आता २३-२४ वर्षाचा नाही. त्यामुळे फिटनेसचा प्रश्न असु शकतो. मात्र या सीझनमध्ये माझे क्षेत्ररक्षण चांगले झाले आहे. मी काही अफलातून झेलही घेतले आहेत. त्यामुळे माझ्या दृष्टीने यावेळेस समाधानकारक कामगिरी झाली आहे. त्यामुळे मी निवृत्ती घेण्याचा प्रश्नच येत नाही.
काही मंडळीकडून केवळ कर्णधार म्हणून माझीच कामगिरी बघितली जात आहे. माझ्या कामगिरीची इतराच्या कामगिरीशी तुलना केली जात नाही. केवळ टार्गेट करण्याच्या उद्देशाने सर्वच पराभवाच्या बाबतीत मला जबाबदार धरण्यात येते हा प्रकार चूकीचा आहे, असे मला वाटते. त्यामुळेच मी आगामी आयपीएल सीझनची तयारी आतापासूनच सुरू करणार असल्याचे सौरभने स्पष्ट केले.