सलमान राजश्रीच्या कौंटुंबिक चित्रपटात

सध्या बॉलिवुडमध्ये  दबंगगिरी करणार्‍या सलमान खानचे कौटुंबिक रूप पाहण्याची इच्छा असणार्‍यांसाठी एक खुशखबर आहे. सूरज बडजात्या यांच्या आगामी चित्रपटात सलमान खान मोठया भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही एक प्रेमकहाणी असणार आहे. यापूर्वी बडजात्या यांच्या राजश्री प्रोडक्शनसोबत सलमानने मैने प्यार किया, हम आप है कौन, हम साथ साथ है असे कौटुंबिक चित्रपट केले होते.

या सर्वच चित्रपटांमध्ये सलमानने शेंडेफळाची भूमिका साकारली आहे; पण आता तो बडजात्यांच्या चित्रपटात मोठया भावाची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातही सलमानचे नाव प्रेम असणार आहे. सध्या सूरज या चित्रपटाच्या पटकथेवर काम करीत असून, इतर कलाकारांची निवड अद्याप बाकी आहे. त्यानंतर या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

Leave a Comment