सलमान आहे सोनाक्षीवर नाराज

`दबंग’ चित्रपटाच्या यशानंतर सलमान खान व सोनाक्षी सिन्हाची जोडी चांगल्याच फॉर्म मध्ये आहे. दबंगच्या यशामुळे सोनाक्षीला त्याचा कितीतरी फायदा झाला आहे. त्यामुळे सोनाक्षीला नवीन चित्रपटाच्या ऑफर मिळाल्या आहेत. `दबंग-२’ काही दिवसातच येत असून त्याचे चित्रीकरण सध्या सुरू आहे.

`दबंग-२’ या चित्रपटातील कथानकाबाबत सलमान खानला सस्पेन्स ठेवायचा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी मात्र दबंग-२ च्या चित्रीकरणाबाबत व कथानकाबाबत बाहेर चर्चा करताना दिसत आहे. इतर चित्रपटाच्या सेटवर ती `दबंग-२’ चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी व सेटवर काय चालले आहे. याबाबत सतत चर्चा करीत असते. यामुळे सलमान तिच्यावर नाराज आहे.

सध्या सोनाक्षी सिन्हा `रावडी राठोड’, `वन्स ऑपन ए टाईम इन मुंबई -२’, `सन ऑफ सरदार जोकार’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये ती व्यस्त आहे. सलमान खानने `दबंग’ चित्रपटाच्या माध्यमातून तिला इंट्री दिली. त्यामुळे सध्या तिच्याकडे बर्‍याच चित्रपटाच्या ऑफर आहेत.

सध्या ती चित्रीकरणाच्या कामात व्यस्त असल्याने सलमान व तिचा आगामी काळात येत असलेल्या `दबंग-२’ चित्रपटाच्या बाबतीत ती इतरत्र सांगत सुटल्याने सलमानची तिच्या बाबतची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे.

याबाबत सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ती म्हणाली की,  `दबंग-२’ चित्रपटाच्या सेटवर काय घडले, याची चर्चा मी बाहेर करीत असले तरी यामध्ये गैर काय आहे असे मला वाटत नाही. मी बाहेर कुठेही चित्रपटाच्या कथानकाबाबत बोलत नाही. त्यामुळे सलमान माझ्यावर नाराज आहेत हे म्हणने चुकीचे ठरेल.

Leave a Comment