मेंबालिशपणाचे ‘डिपार्टमेंटल’ स्टोअर

हिदी चित्रपटसृष्टीला अंडरवर्ल्डचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. असंख्य चित्रपटांतून हा विषय हाताळण्यात आलेला आहे.निर्माता-दिग्दर्शक रामगोपाल वर्मानेही सत्या, सरकार,  कंपनी सारखे अंडरवर्ल्डवरील चित्रपट निर्माण केले आहेत. अमिताभ बच्चनच्या जोडीला संजय दत्तला घेऊन रामुने ‘डिपार्टमेंट’ चित्रपट तयार केला आहे.

‘डिपार्टमेंट’ची कथा सांगायची तर अंडरवर्ल्डची दहशत कमी करण्यासाठी गृहमंत्री, गृहसचिव आणि पोलीस महासंचालक यांची एक गुप्त बैठक होते आणि त्यात एक नवीन डिपार्टमेंट तयार करण्यात येते. ज्याला ‘द डिपार्टमेंट’ नावाने ओळखले जाते.  या डिपार्टमेंटचा प्रमुख म्हणून एन्काउंटर स्पेशालिस्ट महादेव भोसले (संजय दत्त) याची निवड करण्यात येते. त्याला त्याची टीम तयार करण्याचे स्वातंत्र्य असते. तो आपल्या टीममध्ये एक तत्त्वनिष्ठ अधिकारी असलेल्या शिव नारायण (राणा दग्गुबती) याचाही समावेश करतो. शिव नारायणच्या मनात महादेव बद्दल आदर आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट तो शिरसावंद्य मानतो. मात्र, दरम्यानच्या काळात काही घटना अशा घडतात की, ज्यामुळे डिपार्टमेंटमध्ये अर्थात महादेव आणि शिव नारायण यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होतो. या दोघा पोलीस अधिकार्‍यांच्या वादाचा ङ्गायदा अंडरवर्ल्ड सोडून राजकारणी झालेला  सर्जेराव गायकवाड (अमिताभ बच्चन) घेतो. तो दोघांमध्येही संघर्ष कायम ठेवून स्वतःची सत्ता चालवत असतो.

चित्रपटाचे नावच डिपार्टमेंट असल्याने आणि पूर्वप्रसिद्धी बघता चित्रपट हिसक दृश्यांनी ठासून भरलेला असणार याची कल्पना प्रेक्षकांना नक्कीच असते. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाची सुरुवात एका एन्काउंटरने होते. सुरुवातीला हा चित्रपट ङ्गारच रोमांचक असणार, असे प्रेक्षकांना वाटते; परंतु सुरुवातीचा जोर ओसरताच प्रेक्षकांच्या मनात चित्रपट काय असेल, याची कल्पना तयार होते आणि विविध भागांत विभागलेली कथा कंटाळवाणी वाटायला लागते.

रामूने अलिकडच्या आपल्या काही चित्रपटांत कथेपेक्षा जास्त महत्त्व टे*नॉलॉजिला दिले आहे. ‘डिपार्टमेंट’सुद्धा त्याला अपवाद नाही. वेगळं काही करण्याच्या नादात कॅमेर्‍याची हाताळणी समजण्यापलीकडची होऊन जाते. एका दृश्यात पोलीस अधिकारी बोलत असताना कॅमेरा त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव टिपण्याऐवजी एखाद्या प्रोङ्गाइल ङ्गुटेजसारखा त्यांची बॉडी लँग्वेज आणि चहाच्या ग्लासवर ङ्गोकस करत राहतो. दुसर्‍या एका दृश्यात महत्त्वाची मिटिग सुरू असते. मिटिगमध्ये महादेवच्या टीमचे सदस्य आहेत. मात्र, उपस्थितांपैकी एकाचाही चेहरा व्यवस्थितपणे दिसत नाही. चहाची किटली आणि संजय दत्त आपल्या ग्लासात पाणी भरतोय, यावरच कॅमेरा ङ्गोकस आहे. या चित्रीकरणातून रामूला नेमके काय मिळाले, हे त्यालाच ठावूक. कॅमेरावर्क अतिशय बालिशपणे करण्यात आले आहे. 

अभिनयात बिग बी अमिताभ बच्चन यांनी बाजी मारलेली आहे. अमिताभ हाच या चित्रपटाचा यूएसपी आहे.  संजय दत्त आणि राणानेही त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. विजय राजने चांगला अभिनय केला; मात्र त्याची भूमिकाही चित्रपटात अर्धवट वाटत राहाते.

चित्रपटाची थिम चांगली आहे; मात्र  पटकथेवर आणि संवादावर योग्य काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे एक चांगलं कथानक अर्धवटपणे प्रेक्षकांसमोर येते. चित्रपटाच्या संगीताविषयीही बोलण्यासारखे काहीच नाही. आयटम नंबर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन चित्रित करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांचा अभिनय आणि एनर्जी एवढीच एक चांगली गोष्ट या ‘डिपार्टमेंट’ मध्ये आहे.

 

चित्रपट- डिपार्टमेंट

निर्माता-दिग्दर्शक ः रामगोपाल वर्मा

संगीत- बप्पी लाहिरी

कलाकार- अमिताभ बच्चन, संजय दत्त, राणा दग्गुबती, अंजना सुखानी, नतालिया कौर 

Leave a Comment