क्रिश – ३ आता टु डी इफेक्टमध्ये

दिग्दर्शक राकेश रोशनचा बहुचर्चित ‘क्रिश -३ ’ हा चित्रपट ३ डी ऐवजी २ डी  मध्येच येणार आहे. क्रिशच्या सिक्वेलमधील हा चित्रपट पूर्वी ३ डी मध्ये येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते शक्य होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता ‘क्रिश -३ ’चे चित्रीकरण २ डी इफेक्ट मध्ये करण्यात येत आहे.

या चित्रपटात ह्रतिक ररोशनची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट ऑक्टोबर २०१३ पर्यंत पूर्ण होईल असे वाटते.त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे निर्माते टोनी सिंग हे गेल्या काही दिवसापासून ‘शॉट आर्लिन सॉकर’ व ‘हाउस ऑफ फ्लाईंग डॅगर्ल ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याचे समजते. त्यामुळे ‘क्रिश -३’ च चित्रीकरण टुडी इफेक्ट मध्ये करण्यात येत आहे.

यापूर्वी ‘क्रिश ’ चित्रपटाच्या माध्यमातून ह्रतिक रोशनने सुपर हिरोची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यामुळेच राकेश रोशनने ‘क्रिश २’ ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. निर्माते टोनी सिंग व त्याच्या टीमने ‘क्रिश -२ ’ निर्मिती साठी खूपच मेहनत घेतली होती. त्यामुळे क्रिश च्या सिक्वेलमधील हा चित्रपट ही बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. या बिगबजेट चित्रपटाने काही दिवसातच चित्रपटासाठी लावलेला पैसा वसूल केला.

 त्यामुळे राकेश रोशनने ‘क्रिश -३’ हा चित्रपट थ्रीडी इफेक्टमध्ये करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. मात्र कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक त्यांनी हा निर्णय आता बदलला आहे.

Leave a Comment