अक्की म्हणतो प्रेक्षकांच्या मर्जीवर हिरो चालतात

‘रावडी राठोड’ या चित्रपटामधून अँक्शन चित्रपटांमध्ये पुनरागमन करणारा अक्षयकुमार त्याच्या निगेटीव्ह रोल विषयी बराच उत्साहित आहे. अजनबी चित्रपटात त्याने जशी नकारात्मक भूमिका साकारली होती, तशीच भूमिका साकारायची असल्याचे अक्षय म्हणतो. कलाकारांना पूर्णपणे प्रेक्षकांच्या मर्जीप्रमाणे चालावे लागते. जेव्हा शाहरुख रोमँटिक चित्रपट करतो, तेव्हा तो लोकांना आवडतो. लोकांना मी अँक्शन चित्रपटांमध्ये आणि कॉमेडी चित्रपटांमध्ये आवडतो म्हणून मी ते करतो. लोकांच्या पसंती विपरीत काही करणे बरेचदा धोकादायक ठरू शकते. मी स्वतः आठ बाय बारा तस्वीर हा प्रयोगात्मक चित्रपट केला होता, त्याने मी तर खूष झालो; पण चित्रपट फ्लॉप झाला.

Leave a Comment