सैफसाठी करिनाने मोडले वचन

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असे म्हणतात. प्रेमात काही आणाभाका घेतलेल्या असतात. मात्र त्या आणाभाका कशाप्रकारे मोडल्या जातात याचे उदाहरण अभिनेत्री करिना कपूरमुळे समोर आले आहे.

आघाडीची अभिनेत्री करिना कपूर व शाहिद कपूरचे प्रेमपुराण सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या प्रेमकहाणीमुळे काही चित्रपट अक्षरशा बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. त्याकाळी दोघांची केमेस्ट्री ही चांगलीच जुळली होती. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सर्व बॉलीवूडमध्ये पसरल्या होत्या. त्यावेळी करिना कपूरने प्रेम टिकवून ठेवण्यासाठी अनेक आणाभाका घेतल्या होत्या.

शाहिद कपूरला नॉनव्हेज बिलकूल आवडत नाही. तर करिनासाठी नॉनव्हेज म्हणजे जीव की प्राण होते. मात्र करिनाने शाहिदवरील प्रेमापोटी नॉनव्हेज मधील चिकन, मटन खाण्याचे सोडले होते. तशा स्वरूपाचे वचनही करीनाने त्यावेळी शाहिदला दिले होते. करिनाने नॉनव्हेज खाणे सोडून दिल्याने तिचे वजनही चांगलेच घटले होते. त्यामुळे त्याने मधल्या काळात तब्येत झिरो फिगर केली होती. त्यामुळे बॉलीवूडमध्ये अन्य अभिनेत्रींनी तिच्या या फिगरचा चांगलाच धसका घेतला होता.

त्यानंतर कुणास ठाऊक आणि माशी कुठे शिंकली. बर्‍याच दिवसांपासून सुरू असलेले शाहिद-करिना लव्ह स्टोरी सैफ अलीखानमुळे ब्रेक झाली. करीना सध्या दोन मुलींचा बाप असलेल्या सैफच्या प्रेमात बुडाली आहे. आता तिने लवकरच सैफ सोबत लग्न करण्याचा निर्धारही केला आहे.

शाहिद सोबतचे प्रेमसंबंध तुटल्यानंतरही काही दिवस करीना नॉनव्हेज खात नव्हती. आता मात्र तिने पुन्हा सैफ अलीच्या आग्रहास्तव नॉनव्हेज खाणे सुरू केले आहे. यामुळे तिने बर्‍याच दिवसांपूर्वी नॉनव्हेज न खाण्याचे शाहिदला दिलेले वचन मात्र मोडले आहे.

Leave a Comment