संजूने दिली तारीख

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता संजय दत्त शुटिंगच्या कामात बराच व्यस्त आहे. त्यामुळे बर्‍याच दिवसापासून थोड्याशा कामामुळे ‘जिला गाझियाबाद’  हा चित्रपट रखडला आहे. या चित्रपटात संजय दत्त व विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका आहे.

‘जिला गाझियाबाद’ या चित्रपटाचे बर्‍यापैकी शुटिंग पूर्ण झाले असून केवळ पॅचवर्क शिल्लक राहिले आहे. त्यामुळे सात दिवसाचा वेळ या चित्रपटासाठी हवा आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून संजय दत्तला वेळ मिळत नसल्याने चित्रपट पूर्ण होवूनही रेंगाळला आहे. संजयला वेळ नसला तर विवेक ओबेरॉयला वेळ नसतो व विवेकला वेळ असेल तर संजयला वेळ नसतो त्यामुळे ‘जिला गाझियाबाद’चे फायनल शुटिंग सहा महिन्यांपासून पुढे ढकलेले जात होते. मात्र पूढील आठवड्याची तारीख संजय दत्तने आता दिली आहे. त्यामुळे आता सात दिवसातच चित्रपट पूर्ण होईल असे वाटते. विवेकनेपण पुढील आठवड्यात वेळ देण्याची हमी दिली आहे. त्यामुळे लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून व्यस्त शुटिंगच्या कार्यक्रमामुळे ‘जिला गाझियाबाद’ रखडला आहे. याबद्दल स्वत: संजयने नाराजी व्यक्त केली आहे. ठरलेला वेळ देवूनही या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले नाही. त्यामुळे सर्व दोष माझा नसून त्यासाठी युनिट देखील सक्षम असल्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया संजय दत्तने दिली.

Leave a Comment