शाहरूख आणि अक्षय आले एकत्र

शाहरूखखान आणि अक्षयकुमार यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून मतभेद होते. त्यामुळे दोघेही एकमेकांना बोलत नव्हते. शिवाय योगायोगाने एकमेकांसमोर आले तर दोघेही एकमेकांकडे साधे बघतही नव्हते. पण हे दोघातील वितूष्ट आता संपले असून दोघातही चांगली मैत्री झाली आहे.

फराह खान दिग्दर्शीत ‘तिस मार खॉं’ या चित्रपटासाठी सुरूवातीला शाहरूख खानला घेण्यात आले होते. मात्र अचानक फराह खानने शाहरूखला वगळून अक्षय कुमारला या चित्रपटात संधी दिली होती. त्यामुळे शाहरूख अक्षयवर चिडून होता. त्यामुळे दोघेही गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना बोलत नव्हते.

पुण्यातील सहारा स्टेडियमवर परवाच पुणे वॉरियर्स विरूद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स व सामना पहाण्यासाठी व रावडी राठोडच्या प्रमोशनसाठी अक्षयकुमार व सोनाक्षी सिन्हा ही जोडी गेली होती. हाच सामना पाहण्यासाठी या ठिकाणी कोलकत्ता नाईट रायडर्सचा मालक शाहरूख खानही याठिकाणी सामना पाहण्यासाठी आला होता. अक्षयकुमारनी सामन्यास हजेरी लावली आहे असे समजताच शाहरूखने स्वत: जावून अक्षयकुमारीच विचारपूस केली. त्यानंतर मागील बाजूस बसलेल्या ठिकाणाहून त्यांना समोर आणले. यावेळी शाहरूखने अक्षयच्या गळ्यात हातही घातले. दोघेही सुमारे अर्धा तास चर्चा करीत होते. या चर्चेमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दोघातील वादावर पडदा पडला.

दोघातील वाद मिटविण्याचे श्रेय अक्षयकुमारने दिग्दर्शक सबिना खानला दिले. सबिनाने सामन्यावेळी दोघांत मध्यस्थी घडवून आल्यानेच हा वाद मिटला, अशी प्रतिक्रिया अक्षयकुमारने दिली. दरम्यान दोघांतील मैत्री एवढ्यावरच थांबली नाही तर शाहरूखने अक्षय व तिची पत्नी ट्विंकल खन्नाला घरी जेवण्यासाठी आंमत्रित केले आहे. त्यामुळे आता लवकरच अक्षय व टिंवक्ल दोघेही शाहरूखच्या घरी जेवणासाठी जाणार आहेत.

Leave a Comment