व्हिडीओ शूटिंग करू शकणारे अत्याधुनिक टेक्नो ग्लासेस

लंडन- व्हरजेन्स लॅब या संस्थेने व्हिडीओ रेकॉडिंग सुलभतेने व सहजतेने करू शकणारे स्टायलिश टेक्नो ग्लासेस (चष्मे) तयार केले असून कुणालाही ते चष्म्याप्रमाणेच वापरता येणार आहेत. विशेष म्हणजे यावर शूट केलेले व्हीडीओ फेसबुक, यूट्यूब, ट्विटरवरही युजर देऊ शकणार आहेत..

गुगलनेही या प्रकारचे प्रोजेक्ट ग्लास गॉगल्स तयार केले आहेत. सीईओ लॅरी पॅजने मंगळवारीच त्या संदर्भात घोषणा करून लोकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. मात्र गुगलचे हे गॉगल्स बोजड आणि आकर्षक नाहीत याउलट व्हरजेन्स लॅबचे ग्लासेस अत्यंत आकर्षक आणि स्टायलिश आहेत. व्हरजेन्स सध्या या टेक्नो ग्लासेसच्या उत्पादनासाठी फंड गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे.

कंपनीच्या अधिकार्‍यांच्या मते व्हीडीओ शूटिंग करताना अथवा फोटो काढताना कॅमेरा हातात धरावा लागतो अगदी स्मार्ट फोन मधून फोटो घेतानाही फोन डोळ्यासमोर धरावा लागतो. मात्र त्यांच्या टेक्नो ग्लासमध्ये चष्म्याच्या फ्रेमवरचे फक्त एक बटण दाबले की रेकॉडिंग सुरू होते. शिवाय ही फ्रेम ट्रेंडी आणि फॅशनेबल आहे. त्याचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे याच फ्रेमवर असलेले एक जादूचे बटण दाबले की या चष्म्याचे सनग्लासेस मध्ये रूपांतर होऊ शकते. मॉडेल जेम्स डीन, बडी हॅली व क्लार्क कॅट यांच्या स्टाईलने हे ग्लासेस बनविले गेले आहेत.

Leave a Comment