रणवीर सिंह पुन्हा कामावर

चित्रीकरणादरम्यान जर अपघात घडला व त्यात जर चित्रपटातील कलाकार जखमी झाला, तर त्यामुळे चित्रपटाचे बरेचसे नुकसान होते. एकीकडे निर्माता-दिग्दर्शकाची यामुळे चांगलीच हैराणी होते. चित्रपटातील कलाकरांच्या तारखा जुळविल्यासाठी बरीच धावपळ करावी लागते.

‘लुटेरा’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अभिनेता रणवीर सिंह जखमी झाला होता. काही दिवसांपूर्वी ‘लुटेरा’ या चित्रपटाचे चित्रीकरण डलहौसीतील बर्फाळ भागात सुरू होते. यावेळी लगेचच डॉक्टरांना बोलविण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही दिवसांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी काही दिवस घरीच विश्रांतीचा सल्ला दिला होता.

रणवीर सिंहला बर्‍याच दिवसांसाठी विश्रांतीचा सल्ला दिल्याने चित्रपट निर्माता व दिग्दर्शकांची चांगलीच गोची झाली. चित्रपट डिसेंबर अखेर पूर्ण होईल अशी शक्यता गृहित धरून त्याने चित्रपट डिसेंबर २०१२ पर्यंत प्रसिद्ध होईल असे गृहित धरले होते. मात्र रणबीर सिंहच्या अपघातामुळे शुटिंग लांबणीवर पडल्याने सर्वच तारखा वाढल्या होत्या.

काही दिवसांपूर्वीच पुन्हा तंदुरुस्त झाल्याने ‘लुटेरा’ चित्रपटाच्या सेटवर येण्यास सुरूवात केली आहे. तो अपघातातून पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळे त्याने शुटिंगचे काम सुरू केले आहे. त्याने लवकर काम सुरू केल्याने काही अशी चित्रपट निर्मात्याचा जीव भांड्यात पडला आहे. रणवीरसिंहने अपघात झालेल्या डलहौसीतील बर्फाळ प्रदेशातील शुटिंग पूर्ण केले असून त्यामुळे आता ‘लुटेरा’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होवून चित्रपट मार्च २०१३ पर्यंत प्रदर्शित होईल असे वाटते.

Leave a Comment