
पॅरीस- फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष फ्रँकोईल होलेंड आणि त्यांची मैत्रिण व्हेलरी टायविलर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. फ्रान्सचा इतिहासात विवाह न करताच अध्यक्ष व फर्स्ट लेडी बनण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. मात्र व्हेलरी आणि होलेंड या दोघांनीही विवाह हा त्यांचा खासगी प्रश्न असल्याचे व फ्रान्सच्या राज्यघटनेत विवाहित असल्याशिवाय अध्यक्ष व फर्स्टलेडी बनता येणार नाही असा कुठलाही नियम नसल्याचे मत यापूर्वीच व्यक्त केले होते.