दिल्ली पासपोर्ट कार्यालयाकडे इंदिरा गांधी व राजीव गांधींची नोंदच नाही

नवी दिल्ली दि.२३- स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या पासपोर्टसंबंधातील कांही माहिती मिळविण्यासाठी दिल्लीतील माहिती अधिकार कार्यकर्ते देवेंद्रकुमार यांनी पासपोर्ट कार्यालयाकडे केलेल्या अर्जात त्यांना धककादायक माहिती देण्यात आली आहे. देवेंद्रकुमार यांनी ही माहिती मिळविण्यासाठी मे महिन्यात दोन वेगळे अर्ज दिल्ली प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे दाखल केले होते.

देवेंद्रकुमार यांच्या अर्जाला उत्तर देताना पासपोर्ट कार्यालयातील संबंधित अधिकार्‍याने इंदिरा गांधी व राजीव गांधी या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे पासपोर्ट असल्याची नोंद कार्यालयाकडे नसल्याचे कळविले आहे. तसेच या दोन नांवांची नोंदही नसल्याचे कळविले आहे. देवेद्रकुमार यांच्या मते याचा अर्थ सरळ आहे की पासपोर्ट कार्यालयाने आम्ही मागितलेली माहिती जाणूनबुजून लपविली आहे. ते या बाबत अपील करणार आहेत.

पासपोर्ट कार्यालयातील संबंधित अधिकारी अनुराग भूषण यांच्याशी वारंवार फोनवरून व ईमेलवरून संपर्क साधूनही ते प्रतिक्रीयेसाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत असेही समजते.

Leave a Comment