आता आणखी एक कपूर चित्रपटात

सध्या बॉलीवूडवर कपूर व खान फॅमिलीचेच वर्चस्व आहे. एकानंतर एक या फॅमिलीतील मंडळी बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. एकीकडे परवाच बोनी कपूर-श्रीदेवीच्या मुली चित्रपटात सहभागी होणार नसल्याचे श्रीदेवीने सांगितले. तर दुसरीकडे बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अर्जुन कपूर याने काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.

त्याने यशराज फिल्मच्या ‘इश्कजादे’ व ‘वायरस दीवान’ या दोन चित्रपटातून पदार्पण केले आहे. त्यासोबतच बोनी कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया – २’ या चित्रपटातून पदार्पण करीत आहे. ‘मिस्टर इंडिया २’ मध्ये त्याच्यासोबत अनिलकपूर व श्रीदेवी काम करीत असल्याने या चित्रपटातून अर्जुनच्या भूमिकेला फारसा वाव मिळणार नसल्याने बोनी कपूरने लवकरच त्याच्यासाठी आणखी एक रोमँटिक चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले आहे.

विशेष म्हणजे यशराज बॅनर व बोनी कपूरचे संबंध २००३ साली अमिताभ बच्चन सोबत श्रीदेवीने एका चित्रपटात काम करण्यावरून संबंध ताणले गेले होते. या चित्रपटात काम करण्यास श्रीदेवीने नकार दर्शविला होता. त्यावेळेपासून कपूर व यशराज बॅनर यांच्यात फारसे सख्य नव्हते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांनी जुळवून घेतल्याने महाराज बॅनरच्या तीन चित्रपटातून अर्जुन कपूर झळकणार आहे. अनिल कपूरची कन्या सोनम कपूर सोबत आता अर्जुन कपूर हा ही आपले नशीब आजमावत आहे.

अर्जुन हा बोनी कपूरची पहिली पत्नी मोना कपूरचा मुलगा आहे. १९९६ साली बोनी कपूरने मोनाला घटस्फोट देवून श्रीदेवीशी विवाह केला होता. दोन महिन्यापूर्वीच मोना कपूरचे निधन झाले. आता अर्जुन चित्रपटात काय किमया घडविणार याकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत.

Leave a Comment