अमिताभ आता हॉलीवूडमध्ये

चार दशकापासून अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा महानायक अमिताभ बच्चन आता बॉलीवूडनंतर हॉलीवूडमधील चित्रपटात काम करणार आहे. याची कबूली खुद्द अमिताभने ट्विटरवरून दिली आहे.
बर्‍याच दिवसांपासून हॉलीवूडच्या चित्रपटात काम करावी अशी इच्छा होती. आता ती हॉलीवूडमधील ‘द ग्रेट गेटसबाई’ या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. या चित्रपटात तो हॉलीवूनडचा प्रसिद्ध अभिनेता टीबी मॅग्वेट सोबत झळकणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनची छोटीसी भूमिका आहे.

‘द ग्रेट गेटसबाई’ हा हॉलीवूडमधील १२.५ कोटीचा बजेट असलेला मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट ‘एक स्कॉट फिल्ट गोल्ड’ या प्रसिद्ध कांदबरीवर आधारित आहे. अमिताभ या चित्रपटात मेजर कुल्फशेनची छोटीसी भुमिका करीत आहे. त्याचा या चित्रपटातील अभिनय पाहावा यासाठी त्याच्या चहात्यांना संपूर्ण चित्रपट बारकाईने बघावा लागणार आहे. अन्यथा थोडेसे दुर्लक्ष केले, तर अमिताभच्या अभिनयासाठी हा चित्रपट पुन्हा पाहावा लागणार आहे.

या छोटया भूमिकेची माहिती अमिताभ बच्चन यानेच ब्लॉगवरून दिली आहे. या सोबतच त्याच्या चाहत्याने अभिषेक-ऐश्‍वर्याच्या मुलीचे नाव काय ठेवले ? असा प्रश्‍न विचारला होता. त्याचे उत्तरही अमिताभने ब्लॉगवर दिले आहे. त्याने नातीचे नाव पूर्वी ठरल्याप्रमाणे ‘आराध्या’ असे ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या अमिताभ आपल्या ब्लॉगवरूनच बर्‍याच गोष्टीची माहिती देत आहे. त्यामुळे त्याच्या ब्लॉगला भेट देणार्‍या त्याच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Leave a Comment