८ जूनला `शांघाई’ प्रदर्शित होणार

सध्या बॉलिवूडमध्ये दिवाकर बॅनर्जीच्या आगामी शांघाई चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्यातील सगळ्याच कलाकारांच्या लुकवर दिग्दर्शक दिवाकरने विशेष मेहनत घेतली आहे. चित्रपटाची नायिका कल्की कोचलीन हिचा वेगळाच अवतार सादर करण्यात आला आहे. याबाबत कल्की म्हणते, माझी व्यक्तिरेख विद्रूपही दिसावी त्याच बरोबर आकर्षकही असावी, अशी दुहेरी मागणी दिवाकरची होती. त्याच्या या मागणीनुसार एक वेगळेच मिश्रण माझ्या व्यक्तिरेखेत पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे कथानक कल्कीच्या व्यक्तिरेखेभोवती फिरणारे असल्याने चित्रपटाविषयी ती प्रचंड उत्सुक आहे. शांघाईमध्ये कल्कीसह अभय देओल, इम्रान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि येत्या ८ जूनला शांघाई प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment