राहुल करणार आयपीएलला रामराम

भारतीय क्रिकेट संघातून निवृत्ती पत्करल्यानंतर राहुल द्रवीडने आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल संघाचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलच्या पाच सीझनमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या राहुलने आता आयपीएलमधूनही निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

आयपीएलच्या सुरूवातीच्या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स मेंगळरू संघाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती. चौथ्या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्सच्या मॅनेजमेंटशी न पटल्याने त्याने राजस्थान रॉयल संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावेळेसच्या सीझनमध्ये त्याला राजस्थान रॉयल संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवता आले नाही. सुरुवातीच्या चारही सीझनमध्ये राजस्थान रॉयल संघाने सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. तर पहिल्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकण्याचा मान राजस्थान रॉयलने पटकाविला होता.

राजस्थान रॉयलचा कर्णधार म्हणून राहुल द्रवीडने यंदाच्या आयपीएलमध्ये बॅटची चमक दाखवत अव्वल दहा फलंदाजामध्ये स्थान पटकावले आहे. सध्या सर्वाधिक तडकाविणार्‍या फलंदाजात राहुलचा दुसरा क्रमांक लागतो. या कामगिरीच्या जोरावर तो पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत भाग घेईल असे सर्वांना वाटत होते. मात्र राजस्थान रॉयल संघाला अंतिम चार संघात स्थान न देता आल्याने राहुल त्याच्या कामगिरीवर नाखुश असल्याचा समजतो. त्यामुळे आता यावेळेसची स्पर्धा संपल्यानंतर निवृत्ती बाबतचा काय तो निर्णय घेवू असे स्पष्ट केल्याने राहुल द्रवीड आगामी काळात काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता लागली आहे.