बॉलीवूडमध्ये कधी कोणाची कशा स्वरूपाचे काम करण्याची इच्छा होईल, हे काही सांगता येत नाही. सात वर्षानंतर बॉलीवूडमध्ये ऍक्शन चित्रपट घेवून येणार्या दाक्षिणात्य अभिनेता प्रभू देवाची आता हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे.

दाक्षिणात्य चित्रपटातील ऍक्शन हिरो आता नावलौकीक कमविल्यानंतर सलमान व आयेशा एन्ट्री केली होती. त्याने बॉलीवूडमधून अनेक हिट चित्रपटात काम करून काही काळासाठी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. काही दिवसांपासून प्रभू देवाने आपल्या ट्रॅकमध्ये थोडासा बदल केला. काही चित्रपटासाठी त्याने नृत्य दिग्दर्शक (डान्स कोरियोग्राफर) अशी नवी भूमिका साकारली.
त्यानंतर आता तो ‘रावडी राठोड’ चा ऍक्शन चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून पुढे येत आहे. त्याच्या सोबत अक्षयकुमार व सोनाक्षी सिन्हा हे आघाडीचे नायक म्हणून काम करीत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून प्रभूदेवाने नृत्य सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचा रावडी राठोड हा बहुचर्चित चित्रपट १ जूनला प्रदर्शित होत आहे.
दिग्दर्शन करीत असताना आतापर्यंत केलेल्या चित्रपटातील वेगवेगळ्या भूमिकेचा अनुभव कामी येत असून आता ऍक्शन चित्रपटानंतर मला बॉलीवूडमध्ये एक नव्या हॉरर चित्रपटाची निर्मिती करायची आहे. माझे हे चित्रपट निर्मितीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा आशावाद प्रभू देवाने प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.