कथा चांगली असेल तर बिनधास्त भूमिकेची परिणीतीची तयारी

‘इशकजादे’या पहिल्याच चित्रपटाच्या जबरदस्त यशामुळे परिणीती चोप्रा सध्या भलतीच फार्ममध्ये आहे. प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही तिचे कौतुक केले आहे. अभिनय क्षमतेची चुणूक दाखविलेल्या परिणीतीकडे सध्या चित्रपटांची रांग लागली आहे. त्यामुळे भूमिका आणि चित्रपट निवडण्याविषयी परिणीतीची मते विचारली जात आहेत. त्यावर बिनधास्त भूमिका करण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी मला कोणत्याही मर्यादा नाहीत, असे परिणीतीने स्पष्ट केले. माझा स्वतःवर विश्‍वास आहे, असे स्पष्ट करत परिणीती म्हणाली, चित्रपटाची पटकथा चांगली असेल आणि त्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी माझी तयारी आहे.

Leave a Comment