बॉलीवूडमध्ये काम करीत असताना नायिकांनी स्वत:बद्दल काहीतरी आचारसंहिता घालून ठेवली पाहिजे. महिलांचे काम हे चाकोरीबद्ध असेल तरच आगामी काळात महिलांना मुक्तपणे सशक्त अभिनय करता येईल असे मत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये अभिनयाचा दर्जा घसरला असल्याचे पहावयास मिळते. मात्र त्यासाठी अभिनेत्रींनी सशक्त भारतीय महिला म्हणून स्वत:वर बंधने घालण्याची गरज आहे. अभिनेत्रींनी तशा स्वरूपाच्या कामांवर बंधने न घालता प्रोत्साहन दिल्याने स्त्रीयांवरील अन्याय व अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याचे पहावयास मिळते.
आगामी काळात जर महिलांनी बॉलीवूडमध्ये समाधानकारक काम केले तर त्यांना त्या कामाचे समाधान मिळेल. त्यायशिवाय आपल्या कामामुळे कोणाला ओझे वाटणार नाही. त्यामुळे समाजातील अन्याय व अत्याचाराचे प्रमाण कमी होईल.
गेल्या काही दिवसांपासून महिला सबलीकरणाच्या केवळ गप्पाच मारल्या जात आहेत. मात्र त्यासाठी कठोर अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे परिवर्तनाची खरी ताकद महिलांच्या हाती असून, त्यामुळे महिलांनी पुढे यावे असे आवाहनही शर्मिला टागोर यांनी केले.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या `डर्टी’ पिक्चरमधील विद्या बालनची भूमिका पाहिल्यानंतर महिलांनाच त्याचा राग येतो. अशा स्वरूपाच्या अभिनयामुळेच समाजातील अहिंसेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्वच नायिकांनी अभिनयाच्या बाबतीत जागृत राहण्याची गरज आहे.