
सोलापूर, दि. २४ – लोकपाल विधेयकासंदर्भात जनजागृती करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राज्याचा दौरा करीत असून या दौर्याअंतर्गत ते येत्या २६ मे रोजी सोलापुरात येत आहेत, अशी माहिती भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासाचे वसंत आपटे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. २६ मे रोजी रंगभवन येथे आयोजित युवक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी दुपारी शासकीय विश्रामगृहात सर्वसामान्य जनतेला भेटून त्यांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत. सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये अण्णा हजारे यांची जाहीर सभा होणार आहे.