माय लास्ट विश- नवे सोशल नेटवर्क

भारतातील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीने मरणाच्या दारात असलेल्यांना त्यांची  अखेरीची इच्छा म्हणजेच माय लास्ट विश व्यक्त करण्यासाठी नवीन सोशल नेटवर्क उपलब्ध करून दिले असून त्यामुळे अखेरची इच्छा अथवा लास्ट विश शेअर करण्याची संधी  अखेरच्या घटका मोजणार्‍या जगभरातील लोकांना उपलब्ध होऊ शकणार आहे.

आपल्यासारखीच अखेरची इच्छा असणार्‍या जगातील अन्य लोकांशी संपर्क साधणे या नेटवर्कमुळे शक्य होणार आहे. त्यांनी अखेरचा श्वास घेण्याअगोदर त्यांची ही इच्छा त्यांच्याच सारख्या अन्य लोकांबरोबर त्यांना शेअर करता येणार आहे. अॅपलच्या अॅप स्टोअरमधून ही मोफत सेवा सुरू करण्यात आली असल्याचे व्हाईट लोटस कार्पोरेशन या सॉफ्टवेअर कंपनीने जाहीर केले आहे.

कंपनीच्या संचालकांचा त्यामागचा हेतू असा आहे की जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतीत राहिलेले, वाढलेले ,वेगळ्या परंपरा सांभाळणारे , वेगवेगळी जीवनशैली असणारे, श्रीमंत, गरीब आणि सर्वसामान्य नागरिक यात अनेक गोष्टी वेगळ्या असल्या तरी अखेरची इच्छा किवा लास्ट विश ही कॉमन असू शकते. अशा सर्व लोकांनी या नेटवर्कच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात यावे आणि त्यांची मैत्री जुळावी . त्यांची लास्ट विश त्यांनी विश वॉलवर व्यक्त करावी आणि त्याला त्यांच्याच सारखी इच्छा असलेल्या ओळखीच्या ,अनोळखी व्यक्तीकडून प्रतिसाद मिळावा आणि त्यांचा अखेरचा दिस गोड व्हावा.

आपली लास्ट विश विशवॉलवर टाकताना संबंधितांनी त्यांचा फोन नंबर अथवा ईमेल देणे अपेक्षित असून त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधू शकणार्‍या अन्य लोकांना त्याचा उपयोग होऊ शकणार आहे. या नेटवर्कचा निर्माता किरण ठाकर म्हणतो, जगात किमान दोन तरी व्यक्ती, ज्यांची अखेरची इच्छा एकच आहे अशा असणारच असा मला विश्वास आहे. आपल्यासारखीच कोणाचीही तरी अखेरची इच्छा असेल काय या शक्यतेचा या नेटवर्कमुळे प्रत्यक्षात उतरण्याचा आनंद त्यांना मिळू शकणार आहे. सध्या ही सेवा फक्त अॅपलच्या अॅपवरच असली तरी लवकरच ती अॅड्रोईडवरही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Leave a Comment