महाळुंग येथील हेमाडपंती बारवाची पडझड ; पुरातन खात्याचे दुर्लक्ष

श्रीपूर, दि. ०३ मे- महाळुंग येथील आराध्यदैवत यमाईदेवीच्या मंदिराशेजारील हेमाडपंती बारवाची पडझड झाली असून कोणत्याही क्षणी या बारवाचे शिळा बांधकाम ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याकडे पुरातत्वखात्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याबद्दल ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच त्याच परिसरात पुरातन विठ्ठलाचे मंदिर आहे. त्याही मंदिराची पडझड झाली आहे. बारव व विठ्ठलाच्या मंदिराची वेळेत दुरूस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

 महाळुंग येथील यमाई देवीचे मंदिर हे ११ व्या शतकातील असून औंध हे या यमाईदेवीचे मुख्य ठाणे मानले जाते. याच मंदिर परिसरात पुरातन असे बारव व महादेवाचे तसेच विठ्ठलांची मंदिरे आहेत. देवाच्या मंदिरलगतच २७ फूट खोल बारव असून, हा बारव दगडाच्या शिळांपासून त्याकाळी बनविण्यात आला आहे. या बारवामधील पाणी कधीही आटत नव्हते. परंतु गेल्या दहा वर्षापासून पाऊस कमी पडत असल्याने हा बारव पूर्णपणे कोरडा पडला आहे. पूर्वी या बारवामधील पाण्याने देवीला आंघोळ घालण्यासाठी तसेच मंदिर धुण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जात होता.

 

Leave a Comment