इमरान हाश्मीला नकोय रोमँटिक भूमिका

     बॉलीवूडमध्ये रोमँटिक भूमिका म्हणजे लोकप्रियता आणि यश हे समीकरण आहे. त्यामुळे अनेक स्टार्स रोमँटिक भूमिका मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अशी भूमिका मिळाली तरी लॉटरी लागल्याचा आनंद त्यांना होतो. सिरियल किसरची इमेज असलेल्या इमरान हाश्मीला मात्र रोमँटिक भूमिका नकोत. रोमान्स इज नॉट माय कप ऑफ टी असे इमरान हाश्मीने एका मुलाखतीत म्हटले आहे. झाडांभोवती गाणी म्हणत रोमान्स करणे मला जमणार नाही, गुडी गुडी भूमिका करण्यापेक्षा मी वेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याला अधिक पसंती देतो असे त्याने म्हटले आहे. इमरानने रोमँटिक फिल्मस् न करण्याचा जणू चंगच बांधलेला दिसतोय. दिबाकर बॅनर्जी यांच्या आगामी शांघाय या चित्रपटात इमरान एका पोर्नोग्राफरच्या भूमिकेत आहे.
 

Leave a Comment