मुंबई, दि. २३ – अर्शिया रेल इन्फास्ट्रक्चर लि. (एरिल) कंपनीने जीएटीएक्स इंडिया प्रा.लि (जीआयपीएल) कंपनीसोबत नुकताच दीर्घकालीन करार केला. या कराराअन्वये जीआयपीएल एरिल कंपनीस रेल्वेचे डबे/वॅगन भाडेपट्टयावर देणार आहे. यामुळे अर्शिया रेल कंपनीस कमी भांडवली खर्चात व्यवसाय करणे शक्य होणार आहे. परिणामी गिअरिंग कमी होवून कंपनीस आपले मार्जिन वाढविणे व व्यवसाय विस्तारणे शक्य होणार आहे. अर्शिया इंटरनॅशनल ही पुरवठा साखळी पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी आहे. तर जीआयपीएल जगात रेलकार भाडेपट्टयावर देणारी एक प्रमुख कंपनी आहे.
अर्शिया आणि जीएटीएक्स इंडिया यांच्यात करार
एकूण १० वर्षांच्या या व्यापारी करारात जीआयपीएल सुरूवातीस एरिलला नवे कोरे १० बीएलसी रेक्स ऑपरेटिंग भाडयाने देणार आहे. जीआयपीएल कंपनीकडे एकूण ११४ वर्षांचा अनुभव आहे. यामुळे एरिल कंपनीस आपल्या व्यवसायात जागतिक दर्जाचे वॅगन तंत्रज्ञान, उच्च दर्जाची सुरक्षितता राखणे शक्य होणार आहे. याशिवाय ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक सेवा देणे शक्य होणार आहे. यामुळे एकंदर भारतीय रेल्वे मालवाहतूक सेवेत सुधारणा होणार आहे. जीआयपीएल सोबतच्या संबंधामुळे एरिलची रेल क्षमता वाढणार आहे. यामुळे कंपनीने खुर्जा येथे अत्यंत आधुनिक पध्दतीचे नवे रेल टर्मिनल उभारण्याचे योजिले आहे.
अर्शिया इंटरनॅशनल लिमिटेडचे समूह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय एस. मित्तल या कराराविषयी म्हणाले की, अर्शियासाठी हा अत्यंत महत्वपूर्ण करार आहे. त्याचप्रमाणे भारतातील रेल्वेसाठीदेखील तो महत्वाचा आहे. जीएटीएक्स कॉर्पोरेशनचे तंत्रज्ञान अत्यंत आधुनिक असून या क्षेत्रात ही कंपनी आघाडीवर आहे.
जीआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि कंट्री हेड सौरभ सूद म्हणाले की, अर्शिया रेल इन्फास्ट्रक्चर भारतीय बाजारपेठेत कंटेनर रेल वाहतूक करणारी आद्य कंपनी आहे. भविष्यात भारतीय रेल्वे खूप विकास साधेल आणि आमचे संबंध दीर्घकाळ टिकतील याची खात्री आहे.
जीएटीएक्स कॉर्पोरेशनचा बाजारपेठेतील हिस्सा सुमारे २ अब्ज डॉलर आहे. रेलकार लिजिंग व्यवसायात कंपनी जगात प्रथम क्रमांकावर आहे. कंपनीकडे स्वतःचे १६४ हजार रेलकार आहेत.