कागद कोरे करणारे तंत्रज्ञान विकसित

लंडन दि.२२-  युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज मधील संशोधकांनी असे तंत्रज्ञान विकसित केले आहे की ज्यामुळे छापील कागदावरील शाई कागदाचे कोणतेही नुकसान न करता पुसली जाईल आणि हे कागद पुन्हा छापण्यासाठी किवा फोटो कॉपीसाठी वापरता येतील. ज्युलियन ऑलवूड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे तंत्रज्ञान विकसित केले असून त्यात शाई पुसून टाकण्यासाठी लेझरचा वापर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही कागदावरचा मजकूर अथवा चित्रे पुसून टाकायची असतील तर हा लेझर लाईट वापरला जाऊ शकतो. सेकंदापेक्षा कमी वेळात हे काम होते आणि त्यामुळे मूळ कागदाला कोणतेही नुकसान पोहोचत नाही. त्यामुळे भविष्यात प्रिंटर्स, कॉपिअर्सना अनप्रिंट ऑप्शन देऊन वापरले गेलेले कागद पुन्हा वापरात आणता येणे शक्य होणार आहे. यामुळे कागद बनविण्यासाठी झाडांची जी प्रंचड तोड केली जाते तीही करावी लागणार नाही. म्हणजेच झाडे तोडावी न लागल्याने पर्यावरणाचेही रक्षण होऊ शकणार आहे.तसेच रिसायकलींगचा स्वस्त पर्याय या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होऊ शकणार आहे. टोनर्स वरच ही प्रक्रीया अवलंबून आहे.

लंडनमधील अनेक व्यावसायिक कंपन्यांनी पहिले अनप्रिंट उपकरण बनविण्यासाठी या पथकाची संपर्क साधला आहे. सध्या या उपकरणासाठी १९ हजार पौंड इतका खर्च येत असला तरी व्यावसायिक पातळीवर उत्पादन सुरू झाले की तसेच तंत्रज्ञान अधिक विकसित झाले की हा खर्च आटोक्यात येऊ शकणार आहे असे ऑलवूड यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment