अन्नधान्य पुरवठ्याचे नव्याने सर्वेक्षण

नागपूर, दि. २१ – विदर्भात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अन्नधान्य पुरवठ्याच्या सर्वेक्षणात अनेक त्रुटींबरोबर सूचनांचाही अभाव दिसून आला आहे. याबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली असून पुन्हा नव्याने सर्वेक्षण होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी नागपूर विभागात सर्वेक्षण करण्यात आले होते.

मात्र, अन्नधान्य वितरण प्रणालीतील दुकानदारांच्या तक्रारी बघता राज्यपालांना सादर केलेला अहवाल व वस्तुस्थिती यात बरीच तफावत होती. ही बाब राज्यपालांच्या निदर्शनास आली. त्यामुळे विदर्भातीलच नव्हे तर राज्यातील शिधा पत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. हे राज्यपालांच्या लक्षात आले. त्यांनी नव्याने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. २२ ते २५ मेपर्यंत सर्वेक्षण होणार असून महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वेक्षण करणार आहेत.