शिल्पा शेट्टीला पुत्ररत्नाचा लाभ

मुंबई दि.२१- खार येथील हिंदुजा हेल्थकेअर सेंटरमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आणि उद्योजक शिल्पा शेट्टी हिने आज सकाळी एका सुदृढ मुलाला जन्म दिला असून तिची आणि बाळाची तब्येत उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रसंगी तिच्यासोबत तिचा नवरा राज कुंद्रा अणि अन्य कुटुंबिय हजर होते.

राज कुंद्राने ही बातमी ट्वीटरवरही दिली असून तो म्हणतो, देवाने मला सुंदर मुलगा दिला आहे. त्यासाठी मी बायको शिल्पा आणि हिंदुजा मधील सर्व स्टाफचे आभार मानतो. शिल्पाने मला दिलेली ही सर्वात सुंदर भेट आहे.

Leave a Comment