करिश्मा, संजय कपूर घटस्फोटाच्या वाटेवर

करिश्मा आणि दिल्लीचा उद्योगपती संजय कपूर यांचा २००३ मध्ये विवाह झाला खरा पण सुरवातीपासूनच त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आता संजय कपूर व्यावसायिक मॉडेल प्रिया सचदेव हिच्यासोबतची त्याची मैत्री आणखी पुढच्या पातळीवर नेण्याचा विचार करत आहे असे समजते. संजय आणि प्रिया या दोघांनीही आपला भूतकाळ मागे सोडून नवे आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संजयने करिश्माही विवाह करण्यापूर्वी नंदिता महतानी या फॅशन डिझायनर बरोबर विवाह केलेला होता तर प्रियाने न्यूयॉर्कमधील हॉटेल मालक विक्रम चटवाल यांच्याबरोबर घटस्फोट घेतला असून या विवाहापासून तिला एक मुलगा आहे.

करिश्मा आणि संजय कपूर यांना २००५ साली मुलगी झाली त्यानंतर पुन्हा त्यांच्यात मनोमिलन झाले होते. त्यानंतर २०१० साली करिश्माने मुलाला जन्म दिला. मात्र त्यानंतर पुन्हा कांहीतरी बिनसले आहे. करिश्माला संजयच्या नव्या नात्याविषयी माहिती आहे आणि ती सध्या तिची आई बबिताबरोबरच मुंबईत राहते आहे. आपल्या लग्नाविषयी कांहीही विचारू नये असे ती प्रश्नकर्त्यांना सांगतेच पण संजयविषयी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही असेही समजते.

Leave a Comment