
न्यूयॉर्क दि,२२- येथील वॉल स्ट्रीट जर्नलने केलेल्या सर्वेक्षणात २०११ सालासाठी सर्वात अधिक मानधन मिळविणारा सीईओ म्हणून अॅपलच्या टीम कुकचा नंबर लागला असून त्याने या वर्षात वार्षिक पगारापोटी ९लाख डॉलर्स तसेच इन्सेंन्टीव्ह पोटीही ९ लाख डॉलर्स कमावले आहेतच पण अॅपलच्या त्यावेळच्या रिस्ट्रीक्टेड स्टॉक ग्रँटपोटीही ३७६ दशलक्ष डॉलर्स खिशात घातले आहेत. आयफोन आयपॅड मेकर अॅपलची धुरा कुकने ऑगस्टमध्ये म्हणजे कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या मृत्यूआधी दोन महिने सांभाळली होती.