आयडीबीआय’ बँकेच्या करन्सी चेस्टचे उद्घाटन

मुंबई ,दि. २१ – आयडीबीआय बँकेने विविध प्रकारचे चलन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार्‍या करन्सी चेस्टची स्थापना बँकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील शाखेत केली. याचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थ्यापकीय संचालक आर. एम. मल्ला यांनी केले. यावेळी रिझर्व्ह बँकेचे क्षेत्रीय संचालक जे. बी. भोरिया उपस्थित होते. याच शाखेच्या लॉकर सुविधेचे उद्घाटनही यावेळी मल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उपसंचालक बी. के. बत्रा यांच्यासह बँकेचे महाव्यवस्थापक व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सध्या वांद्रे-कुर्ला संकुलातील शाखेत २०६ लॉकर आहेत. नव्या सुविधेमध्ये एक हजार लॉकर सामावून घेण्याची यंत्रणा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक लॉकरसाठी बायोमेट्रिक सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली आहे.