’मारूती’ची यंग ड्रायव्हर स्पर्धा

मुंबई, दि. २१ – मारूती सुझुकी कंपनीने ऑटो कार इंडियाच्या सहकार्याने १८ ते ३० या वयोगटातील अत्यंत सुरक्षित वाहन चालविणार्‍या चालकाचा शोध घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी या दोन्ही कंपन्यांनी यंग ड्रायव्हर स्पर्धा आयोजित केली  आहे. यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. स्पर्धेतील विजेत्याला मारूती सुझुकी-ऑटो कार यंग ड्रायव्हर २०१२ या पुरस्कारांतर्गत या स्पर्धेचा अग्रदूत होण्याचा मान मिळणार आहे. याखेरीज या विजेत्याला मारूती सुझुकीची ए-स्टार ही गाडी भेट मिळणार आहे. यासाठी अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ८ जून आहे. इच्छुक उमेदवारांनी तात्काळ नोंदणी करावी, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment