सॉफ्टवेअर निर्यातीबाबतची व्याख्या सरकारने स्पष्ट करावी- नारायण मूर्ती

बंगलोर दि.२१- इन्फोसिस या जागतिक कीर्तीच्या सॉफ्टवेअर कंपनीचे मानद अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी सरकारने सॉफ्टवेअर निर्यातीबाबतची त्यांची व्याख्या त्वरीत जाहीर करावी असे मत व्यक्त केले आहे. गेली कांही वर्षे सरकारकडे ही मागणी सॉफटवेअर निर्यात व सेवा निर्यात उद्योगांकडून केली जात आहे मात्र अनेक कारणांनी ही मागणी अद्यापी पूर्ण केली गेलेली नाही. या व्याख्येतच स्पष्टता नसल्याने सॉफटवेअर निर्यात व सेवा उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे असे मूर्ती यांनी बंगलोर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.एका पुस्तक प्रकाशन समारंभानंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

मूर्ती म्हणाले की आज सॉफटवेअर निर्यात व सेवा उद्योगांकडून ७० बिलीयन डॉलर्स किंमतीची निर्यात २०११-१२ सालात केली गेली आहे. या व्यवसायाबाबत स्पष्टता असणे गरजेचे असून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या हुषार आणि केपेबल मंत्र्यांनी या बाबतीत त्वरीत स्पष्टीकरण केले तर ते फायद्याचे ठरणार आहे. मुखर्जी हे एक्सलंट पर्सन आहेत अशी टिप्पणी करतानाच मूर्ती यांनी ते या बाबत लवकरात लवकर निर्णय घेतील अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Comment