लोकप्रियतेचा वापर करण्यात गैर काय?

सामाजिक मुद्दे उचलून धरण्यासाठी आमिर खानने त्याची लोकप्रियता वापरली, तर त्यात वाईट काय आहे’, असा प्रश्‍न चित्रपट निर्माता शेखर कपूर यांनी टीकाकारांना विचारला आहे. दोन आठवड्यांतच या कार्यक्रमाने सामाजिक विषयांबाबत जागृत होण्यास भाग पाडले. काही वेळातच हा कार्यक्रम हिट ठरला. त्यानंतर लगेचच विविध मुद्यांवरून सत्यमेव जयते आणि आमिर खान दोघेही वादात अडकले.

सुपरस्टार्स आपल्या लोकप्रियतेचा वापर करून मुद्यांचं भांडवल करतात, अशी टीका त्यावेळी आमिरवर करण्यात आली होती. त्यामुळे संतापलेल्या शेखर कपूर यांनी ट्विटरवर लिहिलंय की, आमिरला या कार्यक्रमासाठी मानधन दिलं जातं, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो का? महत्त्वाच्या सामाजिक विषयांबद्दल जनजागृती करण्यासाठी तो त्याची लोकप्रियता वापरत असेल तर त्यात गैर काय आहे? असं आतापर्यंत तरी कुणीही केलं नव्हतं. आमिरच्या केवळ नावामुळेही काही सामाजिक मुद्दे लोकांपर्यंत तीव्रतेने पोहोचत असल्यास त्यात गैर काय आहे?

Leave a Comment