भविष्यात पारदर्शक टिव्हीची निमित्ती शक्य

लंडन – दूरदर्शनचे संच म्हणजेच टिव्ही अधिकाधिक सडपातळ होऊ लागले असताना भविष्यात सीथ्रू पॅनल स्वरूपातील टिव्ही संच येणे सहज शक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे मत असून हा टिव्ही संच बंद करताच अदृश्य होईल असाही दावा या तज्ञांनी केला आहे.

या साठी टीओएलइडी (टोलेड) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून हे तंत्रज्ञान आत्ताही अस्तित्वात आहे. मात्र ते पुरेसे विकसित झालेले नाही. लुवी (loewe) कंपनीच्या मायकेल फिब्री यांनी २०११ साली झालेल्या कन्सेप्ट डिझाईन स्पर्धेत हे तंत्रज्ञान वापरून बनविलेला स्क्रीन शॉर्ट लिस्ट झाला होता. कंपनी आता एलसीडी व टोलेड तंत्रज्ञानाचा वापर एकत्रित करून कांही प्रयोग करत आहे. त्यात ही दोन्ही तंत्रज्ञाने एकत्रित केल्यामुळे अपारदर्शक , उत्तम रंगातली चलतचित्रे तयार होऊ शकतात हे सिद्ध झाले आहे.

या कंपनीची असे नवेनवे प्रयोग करण्याची क्षमता यापूर्वीही सिद्ध झाली असून त्यांनी १९९८ सालीच इंटरनेट कनेक्शन असलेला टिव्ही सेट तयार केला होता. १९३१ सालातच कंपनीने जगातले पहिले सार्वजनिक टिव्ही ब्रॉडकास्टिंग केले होते.१९५० मध्येच जगातला पहिला कॅसेट टेपरेकॉर्डर तर १९६१ सालात युरोपियन व्हिडीओ रेकॉर्डर तयार केला होता. १९८१ मध्ये युरोपियन स्टीरिओ टिव्ही तयार करण्याचा मान मिळवितानाच १९९८ साली ल्यूवी झेलॉस अॅट मिडिया हा पहिला टिव्ही इंटरनेट अॅक्सिससह बनविला होता. पहिला फलॅट स्क्रीन टिव्ही बनविण्याचा मानही याच कंपनीकडे असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment