करण जोहरने वगळले प्रियांकाला

दिग्दर्शक करण जोहरचा लवकरच वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याने बॉलिवूडमधील सहकारी मंडळींसाठी बर्थ डे पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीसाठी सिनेसृष्टीतील ३०० नामवंत मंडळींना निमंत्रित केले आहे.

करणने मात्र या निमित्ताच्या यादीतून दोघांचे नावे मात्र मुद्दामहून वगळले असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले आहे. करण व दिग्दर्शक असलेल्या रामगोपाल वर्मा यांचे संबंध चांगले नसल्याने करणच्या यादीत रामगोपाल वर्माचे नाव नसणार हे सर्वांनी गृहीत धरले होते. मात्र करणच्या या निमंत्रणाच्या यादीतून आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे नावदेखील गायब झाले आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगवरून करण व प्रियांकाचे संबंध बिघडले असल्याची बातमी सर्वत्र झळकत होती. मात्र त्यावर कोणी अफवा असे म्हणून विश्वास ठेवला नव्हता. मात्र आता बर्थडे पार्टीचे आमंत्रण करणने प्रियांकाला दिले नसल्याने  दोघांचे संबंध बिघडले असल्याचा अंदाज आता सर्वांनाच आला आहे.

या पार्टीचे निमंत्रण पाठवूनही दुसरे काम असल्याने त्याचे सहकारी मित्र अर्जुन रामपाल, अभिनेत्री सोनम कपूर व ऐश्वर्शा रॉय त्यांच्या पार्टीत सहभागी होऊ शकणार नाहीत याची कल्पना करणला सर्वांनी अगोदरच करून दिली आहे.

Leave a Comment