डेटामॅटिक्सचा गौरव

जागतिक स्तरावर माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि नॉलेज प्रोसेस आऊटसोर्सिंग (केपीआ) क्षेत्रात व्यवसाय करणारी डेटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लि. कंपनीस सीएमएमआय (कॅपॅबिलीटी मॅच्युरिटी मॉडेल इंटिग्रेशन) लेवल ३ व्ही १.३ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. डेटामॅटिक्स कंपनीला हे प्रमाणपत्र कंपनीच्या मुंबई व अहमदाबाद येथील सॉफ्टवेअर विकास विभागांसाठी देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र देण्यापूर्वी केपीएमजीतर्फे कंपनीच्या प्रत्येक विभागाचे सलग आठ कामाच्या दिवसांदरम्यान कठोर परिक्षण करण्यात आले. त्यासाठी एसबीएमपीआय मूल्यांकन निकष वापरण्यात आले होते. सीएमएमआय प्रमाणपत्र अमेरिकेतील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट संस्थेतर्फे बहाल करण्यात येते.
   या संदर्भात बोलताना डेटामॅटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष राहुल कनोडिया म्हणाले की, तंत्रज्ञान हे प्रत्येक व्यवसायाचे महत्वाचे अंग आहे. त्यामुळे कंपन्या विश्वसनीय तंत्रज्ञान मिळविण्याच्या शोधात असतात. सीएमएमआय लेवल ३ व्हर्जन १.३ मानांकन आमच्या ग्राहकांना आमची गुणवत्ता व संघटनेची क्षमता याची हमी देते.

Leave a Comment