सलमानमुळे झाली निर्मात्यांची अडचण

    सलमानच्या हेकेखोरपणाची तर सर्वांना प्रचिती आहे. त्यामुळे कित्येक निर्माते व दिग्दर्शक त्याच्या मनमानी वागण्याने हैराण झाले. सलमानच्या या अजब-गजब वृत्तीमुळे चित्रपटातील सहकार्‍यांना मात्र त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
    दिग्दर्शक कबीर खानच्या ‘एक था टायगर’ या सिनेमाचे शुटिंग गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र सलमानच्या वागण्याने ते खूपच नाराज आहेत. सलमानने सुरुवातीपासूनच त्यांना बराचसा त्रास दिला आहे. त्यांनी या चित्रपटातील त्याच्या स्क्रिप्ट सुरुवातीलाच त्याला हवा आहे तसा बदलून घेतला. त्यामुळे तर सलमान व्यवस्थित शुटिंग करेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र ही त्याची अपेक्षा त्यांनी फोल ठरवली.
‘एक था टायगर’च्या शेखर सेटवर तो ठरलेल्या वेळेत कधीच येत नाही. सदैव तो शुटिंगसाठी लेट येतो. त्यामुळे त्याची वाट पाहत सर्व युनीटला तात्काळत बसावे लागते, त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. एवढ्यावरच न थांबता चित्रपटातील काही डायलॉग त्याच्या सोयीनुसार त्याने बदलले आहेत. त्यामुळे चित्रपटातील कथानकात बराच बदल करावा लागला आहे. गाण्याच्या वेळी तो डान्सच्या सांगेल तो टेप्स न करता त्याला आवडेल अशा टेप्स तो करीत असतो. नुकतेच व्हिलनच्या मागे त्याला मारण्यासाठी पळायचे होते असा शॉट होता. मात्र मी व्हिलनच्या मागे पळणार नाही त्यानीच माझ्या मागे पळावे असे सांगून कबीरला चांगलेच अडचणीत आणले. त्याच्या या वागण्याने कबीर वैतागला आहे. सध्या सलमान खान हा बॉलिवूडमध्ये डोकेदुखीच ठरत आहे.

Leave a Comment