
विद्या बालनने गेल्या काही दिवसांपासून आपल्या चौफेर अभिनयाने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली आहे. ‘डर्टी’ चित्रपटामध्ये तिने केलेल्या सिल्क स्मिताची बोल्ड भूमिकेने तर सर्वांची मने जिंकली आहेत.
‘परिणिता’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार्या विद्या बालनने अष्टपैलू भूमिका केल्या आहेत. सर्व प्रकारच्या भूमिका करीत तिने प्रेक्षकांची खर्या अर्थाने करमणूक केली आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरूख खानचा ‘दिलवाले दुल्हनियॉं ले जायेंगे’ हा चित्रपट पाहिल्यानंतर शाहरूख खान सोबत काम करण्याची इच्छा आहे.
पूर्वीच्या काळात रोमान्स चित्रपट म्हटले की, ज्येष्ठ कलाकार राजेश खन्ना व शाहरूख खान यांची आठवण आजही होते. सुरुवातीपासून तिला राजेश खन्नाचे चित्रपट आवडतात. त्यामुळे आता तिला आगामी काळात किंग खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. विशेषत: नातेसंबंधावर आधारित चित्रपट असेल तर काम करण्याची तयारी विद्याने दर्शविली आहे.
सध्या तिच्याकडे बर्याच चित्रपटाच्या ऑफर आहेत. त्यामुळे त्या शुटिंगच्या कामात व्यस्त आहे. आणखी काही नव्या चित्रपटाविषयी तिला विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे जर स्क्रिप्ट चांगली असेल तरच ती चित्रपटाला होकार दर्शविते. `डर्टी’ चित्रपटातील विद्याचा अभिनय पाहून बंगाली चित्रपट निर्माते दिवाकर बॅनर्जी यांनी विद्यासमोर एका बंगाली चित्रपटाचा प्रस्ताव ठेवला आहे. विद्याने या चित्रपटाचे स्क्रीप्ट पाहून बंगाली चित्रपटाला होकार कळविणार आहे. त्यामुळे आगामी काळ हा विद्या बालनच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.