मी कशालाच घाबरत नाही – रेखा

    सध्या खासदार झाल्यामुळे अभिनेत्री रेखा जाम खूष आहे. उशीरा का होईना तिला खासदारकी बहाल करून गौरव केला आहे. बर्‍याच दिवसांपासून ती अभिनय क्षेत्राला दुरावली होती. मात्र आजही ती तिच्या चिरतारुण्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे.
    ती गेल्या दहा ते बारा वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिला गेल्या काही दिवसात बर्‍याच वेळा नवीन चित्रपटाच्या ऑफर आल्या. मात्र तिने स्पष्टपणे नकार दिला. एवढेच नव्हे तर सध्या छोट्या पडद्यावर चालू असलेल्या रिऍलिटी शोमध्ये काम करावे म्हणून अनेकांनी तिच्या घराचे उंबरठे झिजवले. मात्र तिने नकारच दिला. एवढेच नाही तर काही ठिकाणी डान्स शोसाठी ही तिला ऑफर आल्या. मात्र तिने त्याही धुडकावून लावल्या. शेवटी तिच्या अभिनयाची कदर करीत सरकारने तिला राज्यसभेवर घेतले.
    राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्याने ती आनंदी झाली असली तरी याचा फायदा सहकारी कलाकारांना करून देता आला तरच खर्‍या अर्थाने निवड सार्थक होईल असे तिचे म्हणणे आहे. मी जीवनात कशालाच घाबरत नाही. वय वाढत जाईल तशी वृद्धावस्था येणार. त्यानंतर आजारपण येणार त्यामुळे या गोष्टीला मी घाबरत नाही. व्यायाम व डायटिंगच्या माध्यमातून अजून तरी माझी प्रकृती ठिकठाक आहे. त्यामुळे मला सध्या कशाचीच भीती वाटत नाही. काही जणांना वाटते की मला कामाचा कंटाळा आल्याने मी अनेक ऑफर नाकारत असते. मात्र मला कामाचा कंटाळा नसून एकदा काम केले की ते सतत करावे वाटते म्हणून मी टाळते असा खुलासाही रेखाने केला.

Leave a Comment